Gender Equality
Apr 28, 2022
story
मुलगी शिकून काय करणार या विचाराने माझ शिक्षणं ८ वि मध्ये थांबवलं गेल आणि वयाच्या १७ व्या वर्षी माझ लग्न लावून दिल आणि लग्न झाल्यांनतर १ वर्ष मी घरामध्ये व शेतात काम करायचे पण माझं स्वपन्न होते कि मी शिकून स्वताच्या पायावर उभी राहणार व महिला,मुली यांच्यासोबत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार पण लग्न झालं आणि सगळ आयुश्य संपलं म्हणून मी स्वताला बाधून घेतलं आणि सतत ताण तणावामध्ये राहायचे पण १वर्षानंतर मला लग्नाआधीचे मैत्रीण भेटली आणि माझ्याशी संस्थे मध्ये काम करण्याची संधी समोर ठेवली मी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मी घराबाहेर पडायला सुरवात केली आणि मला या कामासाठी नवऱ्याचा विरोध व्हायला सुरु झाला पण मी त्यांना समजावत तसेच काम सुरु ठेवले आणि एक दिवस मला परत कामावरून वाद झाला आणि मला काम किव्हा संसार दोन्ही पैकी एक कर आसा पर्याय दिला त्यामध्ये मी माझ्या मतावर ठाम होते म्हणून मी माझं काम सुरु ठेवलं आणि मी माझ्यासाठी शिक्षणाची संधी निर्मण आणि माझं शिक्षण मी पूर्ण करत आहे आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी दुसरी महानंदा बनू नये म्हणून मी काम करत आहे .
- Girl Power
- Gender-based Violence
- Human Rights
- South and Central Asia
